बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी नगरमधून एका मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे.किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर अशी आरोपींची नावे आहेत. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी शिक्षक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यावर त्याचे मोबाईलद्वारे छायाचित्र घेऊन शाळेत पाठवायचे. त्यानंतर मुलांना या प्रश्नपत्रिका विकल्या जायच्या. एक आरोपी आपल्या १७ वर्षांच्या बहिणीला प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र पाठवायचा. ती प्रश्नपत्रिका पुढे १० हजार रुपयांना विकली जायची. तीच प्रश्नपत्रिका दादर येथील परीक्षा केंद्रावर पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांला पाठवण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selling the 12th question paper for 10 thousand mumbai amy
First published on: 09-03-2023 at 04:44 IST