मुंबई : ‘दि इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लि’.चे वरिष्ठ महाव्यवस्थापक (मुंबई प्रॉडक्शन) भूषण रजनीनाथ टिपणीस यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील माजिवडा परिसरात वास्तव्यास असलेल्या भूषण टिपणीस यांना बुधवारी सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तत्काळ ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले; सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाल़े   गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून छपाई तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञता प्राप्त करून चार दशकांपूर्वी ते दि इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमि.मध्ये वर्क्‍स मॅनेजर पदावर रूजू झाले. ऑफसेट तंत्रज्ञान हा त्यांच्या तज्ज्ञतेचा विषय होता. छपाई क्षेत्राविषयीचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. छपाई विभागातील प्रत्येक यंत्राची क्षमता आणि त्यांच्या दुरुस्तीचे सखोल ज्ञान त्यांना होते. यंत्रांची देखभाल- दुरुस्ती हा त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय होता. विशेष प्रशिक्षणासाठी त्यांना कंपनीतर्फे अमेरिकेलाही पाठविण्यात आले होते. गेली ४० वर्षे ते दि इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमि.मध्ये कार्यरत होते. कडक शिस्तीचे, मात्र मृदू स्वभावाचे असे भूषण टिपणीस अल्पावधीतच कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी बनले. प्रेसमधील प्रत्येक कर्मचाऱ्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. ठाण्यातील माजिवडा परिसरात आर. डब्ल्यू. सावंत मार्गावरील देवश्री गार्डन सोसायटी येथील निवासस्थानातून शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळील स्मशामभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior general manager of the indian express bhushan tipnis passed away zws
First published on: 22-07-2022 at 03:48 IST