आज सकाळी मुंबई शेयर बाजार ( Bombay stock exchange ) सुरु होताच अवघ्या काही मिनिटात बाजारामध्ये एक हजार अंकांची म्हणजे सुमारे १.७० टक्क्यांची घसरण झालेली बघायला मिळाली. यामुळे शेयर बाजार ५७ हजार ३४४ पर्यंत खाली आला होता. तर राष्ट्रीय शेयर बाजारातही ( National Stock Exchange) घसरण बघायला मिळाली. शेयर बाजार सुरु होताच २७० अंकांनी, १.५५ टक्क्यांनी घसरला. सकाळी १० पर्यंत हे चित्र दोन्ही शेयर बाजारात बघायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शेयर बाजारात प्रमुख आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाल्याचं बघायला मिळालं. इ्न्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो अशा काही प्रमुख् कंपन्यांचे समभाग घसरले. तर टाटा स्टील, महिंद्रा अन्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान लिव्हर अशा कंपन्याचे शेयर वधारल्याने मुंबई शेयर बाजारात आणखी घसरण झाली नाही.

आशियातील सर्व प्रमुख शेयर बाजारात सकाळी घसरण बघायला मिळाली. करोनाचे प्रमाण वाढत असल्याने पुन्हा एकदा चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे, त्याचा परिणाम अर्थ व्यवस्थेवर होण्याची शक्यता असल्याने चीनच्या मुख्य शांघाय शेयर बाजारात ०.२२ टक्क्यांनी घसरण झाल्याचे चित्र आहे. सिंगापुरच्या शेयर बाजारात ०.२२ टक्क्यांची घसरण झाली आहे. सर्वात आधी सुरु झालेल्या जपानच्या राष्ट्रीय शेयर बाजारात १.७७ टक्क्यांनी घसरण झालेली बघायला मिळाली. यामुळे शेयर बाजारील घसरणीचा हा कल भारतातही पहायला मिळाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls over 1000 points in early deals asj
First published on: 18-04-2022 at 11:05 IST