मुंबई : पवई येथे १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तटरक्षक दलात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित मुलगी व तिच्या वडिलांना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी विद्यार्थिनी आहे. पीडित मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी सामूहिक अत्याचार, धमकावणे व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव होता. त्यावेळी घरातील सर्व मंडळी बाहेर गेली होती. आरोपीची पत्नीही नवरात्रोत्सवानिमित्त बाहेर गेली होती. आरोपीने त्यावेळी पीडित मुलीला त्याच्या पत्नीने बोलवले असल्याचे सांगितले. ती आरोपीच्या घरी गेली असता आरोपी व त्याच्या साथीदाराने पीडित मुलीचे तोंड दाबून तिला धमकावले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण पीडित मुलीने त्यांना विरोध केला. त्याचवेळी आरोपीच्या पत्नीचा दूरध्वनी आला. आपण घरी येत असल्याचे पत्नीने सांगितल्यावर आरोपी घाबरला व त्याने पीडित मुलीला सोडले. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास पीडित मुलीला व तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने डिसेंबर महिन्यात हा प्रकार आईला सांगितला. आईने वडिलांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तटरक्षक दलाकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

alcohol case, Malvani, four accused,
मालवणी येथील २०१५ सालचे दारूकांड : दोषसिद्ध चार आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Mumbai, Sexual assault,
मुंबई : बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पित्याला अटक
canada police arrested three in nijjar murder case
निज्जर हत्याप्रकरणी तिघे अटकेत; करण ब्रारसह तिघांवर हत्येसह कट रचल्याचा कॅनडा पोलिसांचा आरोप
boy was molested, molest,
१० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
google lay off
Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!
Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई

हेही वाचा – वसंत मोरे यांची शरद पवारांशी भेट, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी मध्यस्थीची विनंती

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

हेही वाचा – घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलावर मित्रांकडूनच अत्याचार

नुकतीच पीडित मुलीने पुन्हा याप्रकरणी ई-मेल पाठवून तक्रार केली होती. तसेच पीडित मुलीने पवई पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. त्यानंतर तत्काळ बुधवारी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोघेही तटरक्षक दलात कार्यरत आहेत. एक आरोपी ३० वर्षांचा, तर दुसरा २३ वर्षांचा आहे.