मुंबई : मस्साजोगचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांची चौकशी झाल्यामुळे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. पक्षाची विद्यमान कार्यकारिणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीद्वारे नेमलेली होती.

हेही वाचा >>> काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात चर्चेत असलेल्या या हत्याप्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा केज तालुका अध्यक्ष संतोष चाटे याच्यावर ‘मकोका’ लावण्यात आला आहे. चाटे हा सध्या पोलीस कोठडीत आहे. या हत्याप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. मंगळवारी अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती घेतली आणि कार्यकारिणी बरखास्त केली. नवी कार्यकारिणी नेमताना सदस्यांच्या चारित्र्याची पडताळणी करावी, असे आदेश पवार यांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिले आहेत. याप्रकरणातील आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने त्यांनी मंत्रीपदाचा राजीमाना द्यावा, अशी विरोधक जोरदार मागणी करत आहेत. मात्र मुंडे हे मंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.