मध्य रेल्वेचा सात दशकांचा प्रवास

७० वर्षांत… निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून ५ नोव्हेंबर १९५१ रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली.

मुंबई: मोठ्या प्रमाणात धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या, उपनगरीय रेल्वे सेवा याबरोबरच अन्य सुविधा देणाऱ्या मध्य रेल्वेने ७० वर्ष पूर्ण के ली आहेत. ५ नोव्हेंबर २०२१ मध्ये ७१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

 मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय सेवा असून ७० वर्षात त्यात अनेक सुधारणा व वाढही झाल्या. मध्य रेल्वेचा सीएसएटी ते कल्याण, कर्जत, खोपोली मुख्य मार्ग, सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्ग, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्ग आणि नेरूळ ते खारकोपर अशा चार मार्गिका आहेत. तीन डब्यांपासून सुरू झालेली लोकलनंतर नऊ डब्यांची, बारा डब्यांची आता पंधरा डब्यांची झाली. शिवाय वातानुकू लित लोकलही चालवण्यात आली.  १९५१ मध्ये ५१९ लोकल फे ऱ्यांवरून हळूहळू वाढ करून २०२१पर्यंत १ हजार ८१४ फे ऱ्यांपर्यंत सेवेचा विस्तार झाला आहे. मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीतही वाढ झाली आहे. नवीन रेल्वे मार्गिका बांधणे, दुहेरीकरण, विद्युतीकरण, पूल आणि नवीन स्थानके  बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामेही वेगाने सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. 

७० वर्षांत… निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून ५ नोव्हेंबर १९५१ रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेचे मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे पाच विभाग आहेत. मध्य रेल्वेचे जाळे महाराष्ट्राबरोबरच, मध्य प्रदेश, कर्नाटक असे ४ हजार १५१ किलोमीटरपर्यंत पसरले असून एकू ण ४७१ स्थानके  आहेत. गेल्या ७० वर्षात अनेक उल्लेखनीय कामगिरी मध्य रेल्वेने के ली असून पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस आणि गेल्या वर्षापासून किसान रेल्वेही चालवण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seven decades of central railway journey akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या