लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सोमालियाच्या किनारपट्टीवरील कारवाईत अटक करण्यात आलेले ३५ पैकी सात सोमाली चाचे अल्पवयीन असल्याच्या दाव्याची चौकशी करा, असे आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी बाल न्याय मंडळाला दिले. या सातही चाच्यांना सध्या डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

सर्व ३५ सोमाली चाच्यांना मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले. त्यावेळी, सात चाच्यांनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली. तसेच, ते अल्पवयीन असल्याचा दावा केला. या चाच्यांच्या दाव्यावर पोलिसांतर्फे संशय व्यक्त करण्यात आला. तसेच, दाव्याची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. त्याचवेळी, हे चाचे अल्पवयीन आहेत की नाही याची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात ते २० वर्षांहून अधिक वयाचे असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

आणखी वाचा-मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर सात सोमाली चाचे अल्पवयीन आहेत की नाही याची चौकशी करण्याचे आदेश बाल न्याय मंडळाला दिले आहेत. दरम्यान, उर्वरित चाच्यांपैकी एकाला पोलीस कोठडी, तर इतरांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.