रक्त चंदनाच्या तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यास मुंबई पोलिसांनी सुरवात केली आहे. सोमवारी रेतीबंदर येथून रक्तचंदन असलेले दोन ट्रक गुन्हे शाखा ३ च्या पथकाने जप्त केले. या ट्रम्क मध्ये एकूण ७ टन रक्त चंदन आहे.
अंमलबजावणी संचनालयानलय आणि भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात कारवाई करून रक्तचंदनाची तस्करी उघड करत ९ कोटी रुपयांचे रक्त चंदन जप्त केले होते. याप्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली होती. या तस्करीचा म्होरक्या मोहम्मद अली याला सोमवारी जामिनावर सुटका झाली. यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा ३ या प्रकरणाचा तपास करत आहे.