मुंबई : विलेपार्ले येथे राहणाऱ्या विवाहीत महिलेवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, महिलेवर गुजरातमधील अहमदाबाद येथे अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लालासाहेब सुखनाथ यादव आणि शशांक संजय सावंत अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांचा राजपूत नावाचा तिसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या तिघांविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचार, विनयभंग आणि धमकी दिल्याच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : मारहाण करून ७०० रुपये लुटणाऱ्या चौघांना अटक

४९ वर्षीय पीडित महिला तिच्या पतीसह मुलांसोबत विलेपार्ले परिसरात राहते. लालासाहेब कांदिवली परिसरात राहत असून तो तिचा जवळचा मित्र आहे. ते दोघेही गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अनेकदा पत्ते खेळण्यासाठी लालासाहेब तिच्या विलेपार्ले येथील राहत्या घरी येत होता. शुक्रवारी ६ जानेवारीला त्याने तिला जुगार खेळण्यासाठी आपल्याला अहमदाबाद येथे जायचे आहे असे सांगून मोटरगाडीमध्ये बसविले. यावेळी त्यांच्यासोबत इतर दोन आरोपी होते. अहमदबाद येथे गेल्यांनतर ते सर्वजण एका सदनिकेत वास्तव्यास होते. तिथेच त्यांनी मद्यप्राशन केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्यप्राशनानंतर पीडित महिलेला लालासाहेबने तिची काही जुनी छायाचित्रे दाखविली. ती छायाचित्रे दाखवून त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याच्या इतर दोन मित्रांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार करून तिचा विनयभंग केला. ते सर्वजण ७ जानेवारी रोजी मुंबईत परत आले. घडलेला प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला आणि नंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे उपस्थित पोलिसांना अहमदाबाद येथे घडलेला प्रकार सांगून तिने तिन्ही आरोपींविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच लालासाहेब यादव आणि शंशाक सावंत या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.