मुंबई : १७ वर्षांपासून एकच जिल्हाध्यक्ष आहे. दहा वर्षांपासून एकच तालुका अध्यक्ष आहे. वर्षांनुवर्षे संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला बाजूला करून ऐन निवडणुकीत दुसऱ्यालाच संधी दिली जाते, अशा प्रकारे पक्षाची बांधणी कशी होणार, असे सवाल अनेक कार्यकर्त्यांनी खुद्द शरद पवार यांच्या समोरच उपस्थित करून पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचे धिंडवडे काढले. यावर पुढील १५ दिवसांमध्ये संघटनेत सुधारणा करण्याचा आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) दोन दिवसीय आढावा बैठकीची सांगता गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. यावेळी शेवटच्या सत्रात राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी गाऱ्हाणी मांडली. पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकजण पदाला चिकटून बसले आहेत. एका जिल्ह्याचा अध्यक्ष सतरा वर्षांपासून तर एक तालुका अध्यक्ष दहा वर्षांपासून त्याच पदावर आहे. संघटनेचे काम अशा प्रकारे चालले तर पक्षाची स्थिती काय होणार. लोकसभा, विधानसभेत पक्षाने उमेदवारी दिलेले अनेक जण आजच्या बैठकीला उपस्थित नाहीत. अशा लोकांना का उमेदवारी देता. वर्षांनुवर्षे आम्ही संघटनेचे, पक्षाचे काम करायचे आणि ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते. मग आम्ही का कामे करायची, असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>>जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण : आरोपी चेतन सिंह मानसिक आजाराने ग्रस्त, अकोला 

नवीन चेहरे, तरुणांना संधी’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत पंधरा दिवसांत बदल केले जातील. वर्षांनुवर्षे एकाच पदावर असलेल्यांना पदोन्नती देऊन वरच्या पातळीवर आणले जाईल. सघंटनेत, पक्षात नवीन चेहऱ्यांना, तरुणांना संधी दिली जाईल. हे करताना राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना, महिलांना प्राधान्याने संधी दिली जाईल. दोन दिवसांत प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या बुथ कमिटीची नावे, त्यांनी केलेली कामे. राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणि विरोधी उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या ई-मेलद्वारे पक्ष कार्यालयाला कळवावीत, जे पदाधिकारी ही माहिती कळविणार नाहीत, त्याचे पद आपोआप जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा

संतोष देशमुखचा खून अत्यंत निर्दयीपणे झाला आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल पाहिजे. त्यासाठी मराठवाड्यात गावोगावी आंदोलने करा. कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका. हा कोणत्या जातीचा नाही तर माणुसकीचा लढा आहे. महाराष्ट्राला न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जनतेची गाऱ्हाणी सरकार दरबारी आपणच मांडली पाहिजेत. लाडकी बहिण योजनेतून एकही महिलेला वगळू देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरोगामीत्व नको, तर देवरस, गोळवलकर पाहिजेत का?

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अनेक जण फुले, शाहू, आंबेडकर विचारणी सोडून देण्याची भाषा करीत आहेत. पण पुरोगामी विचाराशिवाय पर्याय नाही. हिदुत्ववाद्यांनी पहिल्यांदा धर्माच्या नावावर आणि आता जातींच्या नावावर मते मागायला सुरुवात केली आहे. यापुढे जाऊन ते पोटजातींच्या नावे मते मागायला कमी करणार नाहीत. मी वंजारी असूनही, संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक वंजारी तरुण मला फोन करून, आपल्या जातीचा आहे, अशी भूमिका का घेता, अशी विचारणा करतात. पण केवळ फुले, शाहू, आंबेडकरांच्या वैचारिक प्रभावामुळेच मी समाजहिताची भूमिका घेत आहे, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड