राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी राज्यपाल ही एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. तसेच आता यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी काय तो निर्णय घ्यावा असंही पवार म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “शिवाजी महाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श”, राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “वेळ पडली तर आपल्या…”

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर कोश्यारी हे दिल्लीतील उच्चपदस्थांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. असं असतानाच शरद पवार यांनी राज्यपालांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्याचं सांगतानाच दुसऱ्या दिवशी राज्यापालांनी छत्रपतींचे गुणगान गायल्याचा प्रकार म्हणजे उशीरा आलेले शहाणपण असल्याचा टोला लगावला.

“राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधन अशतात. मात्र छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्यात. त्या प्रकरणानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल (चांगलं) बोलल्याचं स्टेटमेंट आलं. मात्र सगळ्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे,” असं पवार म्हणाले. तसेच राज्यपालांचा विषय आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी बघावा असं सूचक विधान पवारांनी केलं. “याचा निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घ्यावा. अशा व्यक्तीला अशा (राज्यपाल पदासारख्या) जबाबदाऱ्या देऊ नये,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “या राज्यपालांना राज्याच्या बाहेर पाठवा, इतका घाणेरडा…”; भगतसिंह कोश्यारींसंदर्भात संभाजीराजे छत्रपतींची मागणी

नेमकं प्रकरण काय?
मराठवाडा विद्यापीठामधील सोहळ्यात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (१९ नोव्हेंबर) मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं.

“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar slams governor bhagat singh koshyari for comment on chhatrapati shivaji maharaj scsg
First published on: 24-11-2022 at 13:46 IST