मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या दोन्ही समभागांचा त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख नाही. विशेषतः ते वितरितही केलेले नव्हते, तथापि, या समभागांवर रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट यांचा समान हक्क असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

टाटा यांच्या मृत्युपत्राची कायदेशीर वैधता निश्चित करण्यासाठी दाखल प्रोबेट कार्यवाहीत न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकलपीठाने उपरोक्त निर्णय दिला. टाटा यांच्या २३ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या मृत्युपत्रातील काही तरतुदींचा अर्थ कसा लावायचा हे न्यायालयाने स्पष्ट करावे, अशी मागणी टाटा यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या त्यांच्या बहीण शिरीन जिजीभॉय यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यानंतर, मृत्युपत्राच्या प्रोबेट कार्यवाहीच्या वेळी न्यायालयाने टाटा यांच्या मृत्युपत्रातील त्यांच्या मालकीच्या सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या दोन्ही समभागांवर रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट यांचा समान हक्क असेल, असे स्पष्ट केले. तसेच, त्यानुसार मृत्युपत्रात सुधारणा करण्यात आली.

टाटा यांच्या मूळ मृत्युपत्रातज्या त्यांच्या मालकीच्या समभागांचा उल्लेख नव्हता, परंतु नंतर २२ डिसेंबर २०२३ रोजी केलेल्या सुधारित मृत्युपत्रात त्यांचा समावेश करण्यात आला होता. अशा समभागांचे काय, असा प्रश्न न्यायालयासमोर होता. तथापि, २२ डिसेंबर २०२३ रोजीच्या मृत्युपत्रातील सुधारित कलमात, रतन टाटा यांच्या मालमत्तेचा उर्वरित भाग रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला समान भागांत वितरीत करण्यात येईल, त्यात, टाटा टाटा यांच्या मूळ मृत्युपत्रात उल्लेख नसलेल्या सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या समभागांचा समावेष होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा यांच्या मूळ मृत्युपत्रात, विविध कंपन्यांमधील समभागांसह उर्वरित आर्थिक मालमत्तांबाबत नमूद होते. तसेच, टाटा यांच्या बहिणींना आणि जवळच्या सहकाऱ्यांना वितरित केल्या होत्या. त्यामुळे, टाटा यांच्या मालकीच्या परंतु मूळ मृत्युपत्रात समाविष्ट नसलेल्या सूचीबद्ध व सूचीबद्ध नसलेल्या समभागांचे काय, हा प्रश्न निर्माण झाला होता.