राज्याचे लक्ष लागलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षांनी मंगळवारी पहिली यादी जाहीर केली. भाजपाने मतदारसंघासह उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने फक्त मतदारसंघांची यादी प्रसिद्ध केली असून, उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. शिवसेनेने १२४ मतदारसंघांची यादी प्रसिद्ध केली आहे. बंडखोरी होण्याचा शक्यता असल्याने शिवसेनेने उमेदवारांच्या नावांची घोषणा टाळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्याची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना युतीच्या जागावाटपाचं कोडं अखेर सुटलं. भाजपा-शिवसेनेनं सोमवारी संयुक्त प्रसिध्दीपत्रकाद्वारे युतीची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी दोन्ही पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, शिवसेनेनं १२४ मतदारसंघाची यादी जाहीर केली असून, उमेदवारांच्या गोपनियता पाळली आहे. त्यामुळे शिवसेना कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकीट देणार हा प्रश्न कायम राहिला आहे. या जागावाटपात भाजपाने आपल्या कोट्यातील विधान परिषदेच्या दोन जागा शिवसेनेला दिल्या आहेत.
युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेले मतदारसंघ –
अक्कलकुवा (अज), धुळे शहर, चोपडा (अज), जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, बुलढाणा, सिंदखेडराजा, मेहकर (अजा), बाळापूर, रिसोड, बडनेरा, तिवसा, अचलपूर, देवळी, ब्रह्मपूरी, वरोरा, दिग्रस, हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर (अजा), वसमत, कळमनुरी, परभणी, गंगाखेड, घनसावंगी, जालना, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम (अजा), पैठण, वैजापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, कळवण (अज), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी (अज), देवळाली (अजा), इगतपूरी (अज), पालघर (अज), बोईसर (अज), नालासोपारा, वसई, भिंवडी ग्रामीण (अज), शहापूर (अज), भिंवडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अजा), कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चांदिवली, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, चेंबूर, कुर्ला (अजा), कलीना, वांद्रे पूर्व, धारावी (अजा), माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, कर्जत, उरण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, पुरंदर, भोर, पिंपरी (अजा), संगमनेर, श्रीरामपूर (अजा), पारनेर, अहमदनगर शहर, बीड, लातूर ग्रामीण, उमरगा (अजा), उस्मानाबाद, परांडा, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (अजा), सोलापूर शहर मध्य, सांगोले, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी, चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले (अजा), शिरोळ, इस्लामपूर, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ हे मतदारसंघ शिवसेनेकडे आले आहे.