बाळासाहेब ठाकरे ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये झळकताना दिसत होते

Shiv Sena , Balasaheb thackeray, Mumbai, twitter trend list, BJP, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
शिवसेनेची ओळख असलेल्या दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला हा योगायोग जुळून आला.

शिवसेनेकडून करण्यात आलेल्या फलकबाजीमुळे बुधवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये झळकताना दिसत होते. विशेष म्हणजे शिवसेनेची ओळख असलेल्या दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला हा योगायोग जुळून आला. गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप यांच्यातील अंतर्गत कुरबुरी आणि पाकिस्तानविरोधी भूमिकेमुळे सेना राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चर्चेत आहे. मात्र, बुधवारी शिवसेनेने मुंबईतील अनेक भागांमध्ये फलक लावून भाजपला गतकाळात केलेल्या उपकारांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. पूर्वी बाळासाहेबांसमोर माना झुकवणारे नेते जुने दिवस कसे विसरले, असा सवाल या फलकांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी लगेचच ही बातमी उचलून धरली. परिणामी दिवसभरात ट्विटर आणि इतर सामाजिक माध्यमांवरही बाळासाहेबांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena former supremo balasaheb thackeray in twitter trend list