उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावरुन परतताच शरद पवारांसोबत बैठक सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची वर्षा बंगल्यावर बैठक

संग्रहित फोटो (PTI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर ही बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी रायगडसाठी १०० कोटींची मदत जाहीर केली असून पंचनामे झाल्यानंतर अंतिम मदत जाहीर करु असं सांगितलं.

१०० कोटींची मदत जाहीर –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाटी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून तातडीनं रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी देत आहोत. एक अंदाज घ्यावा लागेल. उगाच वारेमाप घोषणा करण्यात अर्थ नाही. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर अंतिम मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचं आश्वासन दिलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

“अनेक ठिकाणी पडझड झाली असून स्वच्छता करावी लागेल. जनावर मृत्यूमुखी पडलेलं असेल तर रोगराई होण्याची शक्यता आहे. वीजेचा पुरवठा पूर्ववत झाली पाहिजे. घरं पडली आहेत त्यांची सोय करण्यात येणार आहे. मदतीसाठी बाहेरुन टीम द्याव्या लागतील,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena cm uddhav thackeray and ncp chief sharad pawar meeting at varsha bunglow sgy

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या