शिवसेनेच्या राज्यातील पहिल्या १५ उमेदवारांची नावे शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. यामध्ये आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढळराव-पाटील, चंद्रकांत खैरे, अनंत गिते, प्रतापराव जाधव इत्यादी खासदारांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. शिवसेनेने हातकणंगले मतदारसंघ महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडला असून, सातारा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी देण्यात आला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उर्वरित नाशिक, मावळ, शिर्डी, कोल्हापूर, उस्मानाबाद या पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवार येत्या एक-दोन दिवसांत जाहीर केले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
अमरावती – आनंदराव आडसूळ
रामटेक – कृपाल तुमाणे
यवत – भावनाताई गवळी
हिंगोली – सुभाष वानखेडे
परभणी – संजय जाधव
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
कल्याण – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
ठाणे – राजन विचारे
मुंबई (उत्तर-पश्चिम) – गजानन कीर्तीकर
मुंबई (दक्षिण-मध्य) – राहुल शेवाळे
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
रायगड – अनंत गिते
शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील