उल्हासनगरमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या महिला शाखा संघटक शोभा गमलाडु यांना अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ मधील शिवसेना महिला संघटक शोभा गमलाडूवर मुलींची तस्करी करण्याचा आरोप आहे. कल्याण पश्चिम येथील बिर्ला कालेज समोरील ड्यूक्स प्लाझा  हॉटेलमधून २ मुलींची सुटका करत एचटीसी गुन्हा अन्वेषण विभागाने अटकेची कारवाई केली आहे. महिला पदाधिकाऱ्याला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक केल्यानंतर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  हॉटेलच्या मॅनेजर आणि रिक्षा चालकाला ही पोलिसांनी अटक केली आहे.