scorecardresearch

Premium

सिद्धीविनायक न्यासाचा जीवरक्षकांना मदतीचा हात

तब्बल १२०० जीवरक्षकांचा पाच लाखांचा विमा उतरवला

Siddhivinayak-Ganpati-Mandir
आणखी ८०० जीवरक्षकांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया सुरू (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करणाऱ्या प्रभादेवी येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांच्या सेवेसाठी तैनात असणाऱ्या जीवरक्षकांना मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईमधील समुद्रकिनारे, तलाव, कृत्रिम तलावस्थळी गणेश विसर्जनाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या तब्बल १२०० जल जीवरक्षकांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा न्यासाने उतरविला आहे. तसेच आणखी ८०० जल जीवरक्षकांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिणामी, गणेश विसर्जनसमयी संरक्षण मिळावे यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे डोळे लावून बसलेल्या जीवरक्षकांना दिलासा मिळाला आहे.

bjp leader shahnawaz hussain suffers cardiac arrest
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका, मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु
A cute video of an old couple throwing water on each other is going viral
आजी-आजोबांचं प्रेमाचं भांडण! एकमेकांवर पाणी फेकणाऱ्या वृद्ध जोडप्यांचा गोंडस व्हिडीओ होतोय व्हायरल!
raids on gambling dens
लोणावळा: सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांचा जुगार अड्ड्यावर थेट छापा; अनेकांचे धाबे दणाणले!
amitabh-bachchan-mere-angane-mein
‘केबीसी १५’च्या मंचावर ‘मेरे अंगने में’ गाणं लागताच बिग बी ओशाळले; सांगितला गाण्यामागचा धमाल किस्सा

दरवर्षी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. तब्बल दोन लाख घरगुती आणि १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. दीड, पाच, गौरी-गणपती, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारा गणेश विसर्जन सोहळा ‘यादी देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मुंबईतील ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. उत्साहाच्या भरात भाविक गणेश विसर्जनासाठी समुद्रात उतरतात आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून विसर्जनस्थळी जीवरक्षक तैनात करण्यात येत आहेत. तसेच भाविकांनी समुद्रात उतरू नये यासाठी महानगरपालिकेने गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांकडे गणेशमूर्ती सोपविण्याचा दंडक घातला आहे. या गणेशमूर्तींचे जीवरक्षकांच्या मदतीने विसर्जन करण्यात येते. करोनाकाळापासून भाविकांऐवजी जीवरक्षकच गणेशमूर्तीचे विसर्जन करीत आहेत.

आणखी वाचा-मुलींना शेजाऱ्यांकडे ठेवत असाल तर सावधान! मुंबईत आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, पीडितेने सांगितली आपबिती

गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिका जल जीवरक्षकांच्या पुरवठ्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करीत आहे. मात्र त्याव्यतिरिक्त अन्य काही संस्था, कंपन्या गणेश विसर्जनासाठी विनामूल्य जल जीवरक्षक उपलब्ध करीत आहेत. या संस्था, कंपन्या केवळ सेवा म्हणून जीवरक्षकांचा पुरवठा करीत आहेत. हे जीवरक्षक दिवसभर विसर्जनस्थळी उपस्थित असतात. आळीपाळीने ते समुद्र, तलाव, कृत्रिम तलावात गणेश विसर्जनात मग्न असतात. तसेच गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक समुद्रात उतरू नये याचीही काळजी काही जीवरक्षक घेत असतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी जल जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने नेमणूक केलेल्या कंत्राटदारावर जीवरक्षकांचा विमा उतरविण्याची जबाबदारी असते. विनामूल्य सेवा देणाऱ्या संस्था आणि कंपन्यांच्या जीवरक्षकांची संख्याही मोठी आहे. या सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाने यंदा आतापर्यंत १२०० जल जीवरक्षकांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. आणखी ८०० जीवरक्षकांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आणखी वाचा-राजकीय फलकबाजीने मुंबई विद्रुप

गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने जल जीवरक्षक जीव धोक्यात घालून समुद्रात, तलावात उभे असतात. त्यामुळे सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे त्यांनी विम्याचे कवच देण्यात आले आहे, असे न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Siddhivinayak ganpati mandir trust has insured 1200 water lifeguards for five lakh rupees each mumbai print news mrj

First published on: 27-09-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×