मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील विविध श्रेणींमधील २८० प्रकल्पांमध्ये ‘शासन आपल्या दारी’वर परीक्षकांनी शिक्कामोर्तब केले. यामुळे नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रारूपाची देशात प्रशंसा झाली आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत नेऊन त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने वर्षभर यशस्वीरीत्या चालवला. त्याद्वारे नागरिकांना पाच कोटींहून अधिक लाभ देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी १५ मे रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या या उपक्रमाने ‘स्कॉच’ पुरस्काराच्या नागरिक-केंद्रित प्रशासन या श्रेणीत ८०हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठत पुरस्कार पटकाविला.

हेही वाचा :राज्यभरात थंडीची चाहूल, किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला व्यक्तिश: हजेरी लावली आहे. उपक्रमाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करून राज्यभर एक समर्पित टीम तयार करून तो राबविण्यात आला.

हेही वाचा :पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शासन आपल्या दारी’ने सार्वजनिक सेवा वितरणातील एक उदाहरण देशासमोर निर्माण केले आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाल्यावर व्यक्त केली. तर हा उपक्रम संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्ट्यांशी संलग्न केला आणि प्रशासनामध्ये सुलभ, जलद सेवेचे उत्तरदायित्व निर्माण झाले, हे या उपक्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया डॉ अमोल शिंदे यांनी दिली. ‘स्कॉच’ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.