नवाब मलिकांना अखेर सत्र न्यायालयाकडून दिलासा

नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाकडून परवानगी

Special PMLA court allows NCP leader Nawab Malik to get treated at a private hospital
नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाकडून परवानगी (File Photo: PTI)

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रकृती ठीक नसल्याने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला आहे.

मुंबईत कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्यास न्यायालयाने मुभा दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.

नवाब मलिकांची प्रकृती गंभीर; तीन दिवसांपासून जे जे रुग्णालयात उपचार सुरु

नवाब मलिकांना वैद्यकीय जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. जामीन अर्जात नवाब मलिक यांना कोर्टाला किडनीच्या आजारांमुळे प्रकृती ठीक नसून पायांना सूज असल्याचं सांगितलं होतं. त्याच वेळी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्याचीही मागणी केली होती.

नवाब मलिक यांचे वकील कुशल यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय घरचं जेवण देण्यासाठी जेलमध्ये गेले असता त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं समोर आलं होतं. नवाब मलिक खूप आजारी असल्याचं सांगत कुशल यांनी कोर्टाकडे त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special pmla court allows ncp leader nawab malik to get treated at a private hospital sgy

Next Story
पालिकेतील कारभार धोरणाविनाच ; कामकाजासाठी नवी नियमावली आणण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी