मुंबई: आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत ज्यांची मतदार यादीत नावे आहेत त्यांना मतदान करता येईल. त्यानुसार १ जुलैची अंतिम केलेली मतदार यादी विचारात घेऊन मतदार संख्या, मतदार केंद्र, मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचे नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरूवारी दिले.

जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात वाघमारे यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. १ जुलै पर्यंत नावे नोंदविलेली यादी उपलब्धतेबाबत निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यी पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढेल. मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत. सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी. त्याचबरोबर उपलब्ध मतदान यंत्रांचा अचूक आढावा घेण्यात यावाअसे आदेशही त्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी तातडीने हाती घेण्यात यावी व ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावीत असे आदेश काकाणी यांनी दिले. मतदान केंद्राची जागा निश्चिती, मतदान केंद्र इमारतींची स्थिती, तेथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी; तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.च मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.