मुंबई : राज्यात उसाचा गाळप हंगाम सुरू असतानाच साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल ३३०० रुपये इतक्या निचांकी पातळीवर आले आहेत. २०१९ पासून साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवर स्थिर आहे, दुसरीकडे उसाच्या एफआरपीत दरवर्षी वाढ केली जात आहे, त्यामुळे साखर कारखान्यांचा आर्थिक डोलारा अडचणीत आला आहे. 

देशभरात नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू झाला आहे. देशासह, राज्यात गाळपाला अपेक्षित गती आली नाही. गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्याही घटली आहे. शिवाय दिवाळीत साखरेचा प्रति क्विंटल दर ३७०० रुपयांवर गेला होता. दिवाळीपासून आजघडीला साखरेच्या दरात प्रति क्विंटल ४०० रुपयांपर्यंत घट झाली आहे, सध्या साखरेचा दर दर्जानिहाय प्रति क्विंटल ३२५० ते ३३०० रुपयांवर आला आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये साखरेचे दर ३३०० रुपयांपर्यंत खाली आले होते. हंगामात साखरेला चांगला दर मिळाला तर कारखानदार साखर विकून उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) देतात. पण, साखरेचे दर पडले तर साखर गोदामांमध्ये साठवून ठेवावी लागते. त्यामुळे साठवणुकीचा खर्च वाढतो आणि कारखान्यांकडे खेळते भांडवलही राहत नाही.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet Expansion : “महायुतीत मलईदार खात्यांसाठी भांडणं”, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

साखरेचे दर का पडले

थंडीच्या दिवसांत आईस्क्रीम, शीतपेयांची मागणी घटते. सध्या सण – उत्सवही नाहीत, या सर्वांचा थेट परिणाम म्हणून साखरेची मागणी घटते. दरात पडझड होते. दिवाळीत साखरेचे दर ३७०० रुपये प्रति क्विंटलवर गेल्यानंतर केंद्र सरकारकडून बाजारात साखरेचा पुरवठा वाढविण्यासाठी काखान्यांना जास्त कोटा दिला होता. महिन्याला सरासरी देशाला २२ लाख टन साखर पुरते. दिवाळीमुळे केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात देशभरातील कारखान्यांना २५ लाख टन साखर बाजारात विकण्यास परवानगी (कोटा) दिली होती. पण, अतिरिक्त साखरेची विक्री झाली नाही. कारखान्यांकडे साखर पडून राहिली. नोव्हेंबर महिन्यात २२ लाख टनांचा कोटा दिला आहे, तरीही बाजारातून मागणी नसल्याची स्थिती आहे.

हेही वाचा >>> Dadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाबाबत मोठी माहिती, मंगलप्रभात लोढा म्हणाले…

राज्यातील कारखाने तोट्यात

केंद्र सरकारकडून देशातील सर्व साखर कारखान्यांना प्रत्येक महिन्याला साखर विक्रीचा कोटा ठरवून दिला जातो. दिलेला साखर कोटी संपविण्याचा दबाव कारखान्यांवर असतो. इथेनॉलचा कितीही गाजावाजा केला तरीही आजघडीला साखर विक्रीतून आलेला पैसा हाच कारखान्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. कारखान्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न साखर विक्रीतून मिळते तर उर्वरित २० टक्के उत्पन्न इथेनॉलसह अन्य उपपदार्थांपासून मिळते. त्यामुळे चांगल्या दराने साखर विक्री झाल्या शिवाय कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळत नाही. एकीकडे एफआरपीत सतत होणारी वाढ आणि दुसरीकडे साखर विक्रीचे दर २०१९ पासून स्थिर असल्यामुळे कारखाने तोट्यात जात आहेत आणि तोटा सातत्याने वाढतच आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकार कडून प्रतिसाद मिळत नाही साखर कारखाने तोट्यात आहे, तोटा सातत्याने वाढतच आहे. अनेकदा केंद्र सरकारकडे साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली. पण, प्रतिसाद मिळत नाही,असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.