मुंबईचे नवे पालक सचिव म्हणून राज्याचे राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आली.
राज्य सरकारने गुरुवारी तीन जिल्ह्यांसाठी नव्या पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंह यांची एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यामुळे मुंबईचे पालक सचिवपद रिक्त झाले होते. त्या ठिकाणी मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रायगड जिल्हयाचे पालक सचिव म्हणून पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांची तर नंदूरबारचे पालक सचिव म्हणून आदिवासी विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.