अपुरे मनुष्यबळ, खाटा, गैरव्यवस्थापन यांमुळे गेले काही दिवस पालिका रुग्णालयांबाबत रूग्णांच्या व नातेवाईकांच्या खूप तक्रोरी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मदन नागरगोजे, अजित पाटील आणि बालाजी मंजुळे हे अधिकारी काम पाहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानुसार मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयासाठी मदन नागरगोजे, परळच्या केईएम रुग्णालयासाठी अजित पाटील, तर शीव येथील लोकमान्य टिळक सवरेपचार रुग्णालयासाठी बालाजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नायर रुग्णालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेले मदन नागरगोजे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००७ च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या राज्य शासनात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. केईएम रुग्णालयाचे व्यवस्थापकीय दायित्व सोपविण्यात आलेले अजित पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००७ च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या महा-आयटी महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर सध्या राज्य शासनाच्या नियोजन विभागात उपसचिव पदावर कार्यरत असणारे बालाजी मंजुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supervision of external officers in the management of municipal hospitals abn
First published on: 22-05-2020 at 00:39 IST