scorecardresearch

दिलीप कुमार यांनी बिल्डरशी चर्चा करून बंगल्याचा वाद सोडवावा- सर्वोच्च न्यायालय

दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगल्याचा वाद

dilip kumar
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या मुंबईतील पाली हिल येथील बंगल्याच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलीप कुमार आणि बांधकाम व्यावसायिकाला आपसात चर्चा करुन उपाय शोधण्यास सांगितले. दिलीप कुमार आता ९५ वर्षांचे आहेत आणि कोर्ट केसमध्ये कदाचित या समस्येवर समाधान निघू न शकल्याने त्यांनी एकमेकांशी चर्चा करून उपाय शोधावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दिलीप कुमार यांच्या बाजूने मुकुल रोहतगी आणि बिल्डर प्राजिता यांच्या बाजूने पी चिदंबरम यांनी कोर्टासमोर बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान मुकुल रोहतगी कोर्टात दिलीप कुमार यांची बाजू मांडताना म्हणाले की, ‘हा बंगला दिलीप कुमार यांचा आहे. ते ९५ वर्षांचे असून प्रसिद्ध अभिनेते आहेत. २००६ साली त्यांनी बंगल्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम व्यावसायिकाशी करार केला होता. मात्र त्याने थेट बंगला पाडण्यास सुरुवात केली.’

दिलीप कुमार यांचा पाली हिल येथील बंगला सध्या अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे. अशा वेळी बांधकाम व्यावसायिकाचे सुरक्षारक्षक तेथून हटवून बंगल्याला दिलीप कुमार यांच्या स्वाधीन करावे, अशी विनंती रोहतगी यांच्याकडून कोर्टात करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूस बांधकाम व्यावसायिकाचं म्हणणं आहे की त्याने बंगल्याच्या बदल्यात वेळोवेळी ८.५ कोटी रुपये दिलीप कुमार यांना दिले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-07-2017 at 20:42 IST
ताज्या बातम्या