मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
निकालाचा अभ्यास करू- भुजबळ
या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून राज्य सरकार पुढील पावले टाकेल. या निकालासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा एक राज्य सरकारसमोर पर्याय असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.