मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याने अपात्रतेची कारवाई करण्यात यावी असे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. त्यावर  खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी पक्षविरोधी कार्यवाही केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तटकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही वाचा >>> ओबीसींना धक्का न लावता मराठा आरक्षण! शिंदे-फडणवीस यांची महायुतीच्या आमदारांना ग्वाही 

केंद्र सरकारने मांडलेल्या महिला विधेयकाच्या वेळी खासदार तटकरे संसदेत उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कृतीची याचिका दाखल करून चार महिन्यांच्या कालावधी उलटला आहे, तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुुळे राज्य घटनेच्या परिशिष्ट दहाचे उल्लंघन झाले असून त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी अध्यक्ष बिर्ला यांच्याकडे पुन्हा केली आहे.

हेही वाचा >>> कुणबी नोंदींचा शोध राज्यभर; दर आठवडय़ाला कार्यअहवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तटकरे यांच्यावर कारवाई न करण्यामागे दिल्लीतील अदृश्य शक्तीचा हात आहे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे खच्चीकरण करीत आहे, असा आरोप सुळे यांनी केला आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सर्वोच्च न्यायालय कमालीचे नाराज असून देश हा कोणाच्या मर्जीवर चालत नाही, असा टोला मारला.  सुळे यांच्या या पत्रावर संध्याकाळी  तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. तटकरे यांच्या अपात्रतेवर लोकसभा अध्यक्षांना पत्र देणाऱ्या सुळे यांच्यासह, श्रीनिवास पाटील, आणि फैजल यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्याचे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शरद पवार यांच्या गटात असल्याचा दावा करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी ते अजित पवार गटाबरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वीच दिले असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.