मुंबई : मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचा आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावला आहे. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरू असल्याचेही सिस्ट्राने स्पष्ट केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आर्थिक लाभासह अनेक गंभीर आरोप फ्रान्स येथील सिस्ट्रा कंपनीने केले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचे एमएमआरडीएने नमूद केले होते. त्यावर भूमिका स्पष्ट करणारे पत्र सिस्ट्राने गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. सिस्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरी कुमार सोमलराज यांच्या नावे हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासाठी फ्रान्समधील सिस्ट्रा कंपनी सल्लागार म्हणून काम पाहत आहे. मात्र नुकतेच त्यांनी एमएमआरडीएवर आर्थिक लाभाच्या मागणीचा गंभीर आरोप केला आहे, तर एमएमआरडीएने त्यांचे हे आरोप फेटाळून लावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम करण्याचीही इच्छा

न्यायालयाने करार निलंबनाची नोटीस रद्द केली असली तरी कंपनीविरोधात कारवाई करण्याचे एमएमआरडीएचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. एमएमआरडीएने याचअनुषंगाने सिस्ट्राविरोधात कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता मात्र सिस्ट्राने नरमाईची भूमिका घेतली असून एमएमआरडीएसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.