सलमान खानविरोधात तामिळ संघटनांची निदर्शने

श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचारात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी झाल्याने तमिळ भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली

श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांच्या निवडणूक प्रचारात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी झाल्याने तमिळ भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, तमिळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
सलमानच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या तमिळ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  तमिळ भाषिकांवर अन्याय करणा-या श्रीलंकन पंतप्रधानाच्या निवडणूक प्रचारात सलमान खानला सहभागी व्हायची गरज काय होती, असा आरोप करीत तमिळ संघटनेच्या ५० कार्यकर्त्यांनी सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर हल्लाबोल केली. या वेळी तमिळ कार्यकर्त्यांनी सलमानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tamil group protests against salman over rajapaksa support

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या