मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘सैराट’ चित्रपटाच्या टीमने गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ‘सैराट’मध्ये काम केलेल्या मुलांचे यश आवाक करणारे असल्याचे प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. याशिवाय, या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू दे आणि यापुढेही त्यांना असेच यश मिळू दे, अशी प्रार्थना उद्धव यांनी केली. ‘सैराट’मधील अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्व टीमला उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाची मूर्ती आठवण भेट म्हणून दिली.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2016 रोजी प्रकाशित
Sairat: ‘सैराट’ची टीम ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंनी दिली अनोखी भेट
'सैराट'मध्ये काम केलेल्या मुलांचे यश आवाक करणारे असल्याची प्रतिक्रिया
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 19-05-2016 at 16:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team sairat meets uddhav thackeray on matoshree