मुंबईच्या तापमानात मोठे चढ-उतार

मुंबई शहर आणि उपनगरांतील किमान तापमानात गुरुवारी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ४ आणि १ अंशांची घट झाली.

मुंबई : पावसाळी वातावरणामुळे मुंबई आणि परिसरातील तापमानात गेल्या दोन-तीन दिवसांत मोठे चढ-उतार नोंदविण्यात आले आहेत. मुंबईच्या तापमानात बुधवारपाठोपाठ गुरुवारीही मोठी घट नोंदविण्यात आली. गुरुवारी कुलाबा येथे २५.८ तर सांताक्रूझ येथे २६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या दोन्ही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत तापमानात ७ अंशांची घट नोंदविण्यात आली. बुधवारीही त्यात आठ अंशांची घट नोंदविण्यात आली होती. मंगळवारी सांताक्रूझ येथे ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

मुंबई शहर आणि उपनगरांतील किमान तापमानात गुरुवारी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ४ आणि १ अंशांची घट झाली. डहाणू येथे किमान १८.६ अंश सेल्सिअस, तर कमाल २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ९१.२ मिमी आणि कुलाबा येथे ९०.२ मिमी पावसाची नोंद झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Temperature in mumbai dropped sharply mumbai temperature zws