ठाणे येथील जांभळीनाका परिसरातील जीवन ज्योती या दुकानापाठोपाठ महापालिकेच्या पथकाने गुरूवारी स्थानिक संस्था कर न भरणाऱ्या आणखी दोन दुकानांवर धाडी टाकल्या. पण, या व्यापाऱ्यांनी नेमका किती कर बुडविला, याविषयी रात्री उशीरापर्यंत   माहिती मिळू शकली नाही.
ठाणे महापालिकेने स्थानिक संस्था कर भरण्यासंबंधी व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. पण, काही व्यापाऱ्यांनी त्यास केराची टोपली दाखविल्याने महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी जांभळीनाका परिसरातील जीवन ज्योती दुकानावर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली होती. त्या पाठोपाठ गुरूवारी त्रिमुर्ती वाईन्स आणि हस्तकला या दुकानांवर पथकाने धाडी टाकली.
महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून एलबीटी उपायुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.