बीअर म्हटलं की दारूचा एक प्रकार असं सर्रास वर्गीकरण आपल्याकडे केलं जातं. मात्र, आजघडीला पाणी आणि चहानंतर सर्वाधिक प्राशन होणारा द्रवपदार्थ म्हणून बीअरचा क्रमांक लागतो. बीअरचा उगमही ख्रिस्तपूर्व ९५०० सालातील आहे. त्यामुळे सर्वात प्राचीन मानवकृत मद्य म्हणूनही बीअरची ओळख आहे. बीअरच्या या इतिहासातील आणखी एक मानाचे पान म्हणजे गेल्या २०५ वर्षांपासून जर्मनीमध्ये साजरा होणारा ‘ऑक्टोबर फेस्ट’. ‘व्हीट बीअर’ अर्थात गव्हापासून बनवलेल्या बीअरच्या फेसाळत्या चषकानिशी लोककला, संगीताचा आनंद लुटत साजरा केला जाणारा हा ऑक्टोबर फेस्ट यंदा मुंबईतही अनुभवायला मिळणार आहे.
मुंबईतील ‘द बीअर कॅफे’ या रेस्टॉरंटतर्फे ऑक्टोबर फेस्टच्याच धर्तीवर ‘ऑक्टोब्रू फेस्ट’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नागरिकांना ‘पॉलेनर ओरिजिनल’, ‘पॉलिनर हेफे वाएसबीअर’, ‘एरडिंगर वाएसबीअर’, ‘एरडिंगर डंकेल’, ‘स्नाइडर विस्सी’ अशा जर्मन व्हीट बीअर चाखायला मिळणार आहेत. पॉलेनर ओरिजिनल, पॉलेनर हेफे वाएसबीअरच्या ४ पाईंटसाठी १९९५ रुपये मोजावे लागणार आहेत. एरडिंगर वाएसबीअरच्या ४ पाईंटसाठी २०९५ रुपये तर एरडिंगर डंकेलच्या ३ बॉटल्ससाठी २०९५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे स्नाइडर विस्सी या बीअरच्या ४ पाईंटसाठी २४९५ रुपये मोजावे लागणार आहेत. या महोत्सवात कॉफीची चव असलेली ‘एरडिंगर डंकेल’ ही बीअर उपलब्ध आहे. बीअरच्या सोबतीला विविध प्रकारचे शाकाहारी आणि मासाहारी खाद्यपदार्थही महोत्सवात उपलब्ध असणार आहेत. हा महोत्सव कुर्ला येथील मार्केट सिटी मॉल, पवईतील गॅलेरिया मॉल येथे ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The beer cafe mumbai celebrate german beer festival
First published on: 10-10-2015 at 02:36 IST