दिवाळीच्या दिवसात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रोषणाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आता विभाग कार्यालयांनी वेगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गोरेगाव येथील स्वामी विवेकानंद रस्ता, पश्चिम दृतगती मार्ग तसेच लिंक रोड आणि काही वाहतूक बेटे येथे रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून गोरेगावकरांना नेत्रदीपक रोषणाई पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- दिवाळीपूर्वी मुंबईत मोठी कारवाई; २३ लाख ७४ हजारांची भेसळयुक्त मिठाई जप्त

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

दिवाळीनिमित्त यंदा मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेतर्फे आठवड्याभरासाठी रोषणाई करण्यात येणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी ही रोषणाई केली जाणार असून पालिका त्याकरिता ३.६ कोटी खर्च करणार आहे. प्रत्येक विभागासाठी १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे, वाहतूक बेटे, रस्ते, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी रोषणाई करून पालिकेतर्फे यंदा दिवाळी साजरी केली जाणार आहे. ही रोषणाई केवळ दिवाळीच्या आठवड्यासाठी असेल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तीन दिवस रोषणाई करण्यात आली होती. आता तशीच दिवाळीसाठी केली जाणार आहे. २४ विभागांमध्ये विभाग कार्यालयामार्फत ही रोषणाई केली जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांच्या दृष्टीक्षेपात असलेली ठिकाणे याकरिता निवडण्यात येणार आहेत.

हेही वाचा- तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्यातच ; गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारच्या हालचाली

या कामासाठी आयुक्तांनी विशेष निधी अत्यंत तातडीने उपलब्ध करून दिला होता आणि हे काम अत्यंत तातडीने करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गोरेगाव परिसरात काम पूर्ण करण्यात आले आहे.