मुंबई : राज्यामधील वैद्यकीय महाविद्यालये जिल्हाधिकारी, लष्करी आणि खाजगी मालकांच्या नावावरील जमिनीवर उभी आहेत. भविष्यात या जागांसंदर्भात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची जागा ‘अधिष्ठाता जीएमसी’ या नावे करण्याबाबतचा विचार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग करीत आहे.

सध्या राज्यामध्ये २३ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. ही सर्व वैद्यकीय महाविद्यालये जिल्हाधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, लष्कर किंवा खाजगी मालमत्तेत आहेत. ही महाविद्यालये उभी असलेली जागा आरोग्य विभागाच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असली तरी त्यावरील मालकी हक्क वैद्यकीय महाविद्यालयाकडे नाही. त्यामुळे भविष्यात जागेवरून काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

हेही वाचा >>> मुंबई : गतसत्राच्या निकालाची आणि आगामी परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा, चार महिन्यांनंतरही तृतीय सत्र परीक्षेचा निकाल नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बाब लक्षात घेऊन राज्यातील सर्व २३ वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा ‘अधिष्ठाता जीएमसी’च्या नावे करण्यात यावी असे सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना सूचित केले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच राज्यातील सर्व वैद्यकीय, दंत वैद्यकीय, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून हालचाली करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.