Video : कचरा वेचता वेचता जपतोय आपली आवड; तिसरीतल्या मुलाचा अनोखा संघर्ष

तिसऱ्या इयत्तेत शिकणारा राहुल आपल्या घरातल्यांचं पोट भरायला कचरा वेचण्याचं काम करतोय. पण यामुळे तो आपली आवड जपण्यात अजिबात मागे पडत नाहीय.

Rahul Naidu
अवघ्या सात ते आठ वर्षाचा राहुल नायडू कचरा वेचून दिवसाला १००-२०० रुपये कमावतो.

मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे असं म्हटलं जातं. कित्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. अशीच मेहनत करतोय मुंबईतल्या मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात राहणारा राहुल नायडू. तिसरीत शिकणारा राहुल आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या आईला हातभार म्हणून कचरा वेचण्याचं काम करतोय. पण हे करताना तो आपली आवड देखील जपतोय. तर या व्हिडीओमधून पाहुयात कचरा वेचून आपलं पोट भरून कला जोपासणाऱ्या राहुलची कहाणी…

राहुल कचरा वेचून आपल्यासोबतच आपल्या कुटुंबच पोट भरायला हातभार लावतोय, शिकतोय, त्याचबरोबर आपली कला जोपासण्याचा प्रयत्न देखील करतोय. राहुलसारखीच अनेक मुलं मुंबईच्या कानाकोपऱ्यात आपल्या हालाखीच्या परिस्थितीमुळे संघर्ष करत आहेत आणि आपल्या कलागुणांना वाव मिळावा याच अपेक्षेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The story of rahul who is pursuing his passion by selling garbage pvp

ताज्या बातम्या