मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती मार्ग उजळून निघणार आहे. या मार्गावरील सर्व पथदिवे एलईडी करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका त्यासाठी ६३ लाख रुपये खर्च करणार आहे.मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत संपूर्ण मुंबईत दिव्यांचा लखलखाट करण्याचे पालिकेने ठरवले आहे. रस्ते, पूल, आकाशमार्गिका, समुद्र किनारे याठिकाणी दिव्यांचा कायमस्वरूपी लखलखाट करण्यात येणार आहे. मुंबईतील एकही जागी अंधार राहणार नाही, यादृष्टीने दिवे लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>>लोकलमधील अपंगांच्या डब्यात घुसखोरी वाढली; दहा महिन्यात ८ हजार ८१९ प्रवाशांवर कारवाई

या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभिकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. डिसेंबर २०२२ पर्यंत किमान ५० टक्के कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १६ विविध प्रकारची कामे या सुशोभिकरणांतर्गत केली जाणार असून त्यात स्वच्छतागृहांची बांधणी, मियावाकी वृक्ष लागवड, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभिकरण, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण अशा कामांबरोबरच रोषणाईवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.

हेही वाचा >>>‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार, जर…”

हा एकूण प्रकल्प १७२९ कोटींचा आहे. त्यापैकी ९३९ कोटी रुपयांचा निधी विभाग स्तरावर दिला जाणार आहे तर रस्ते, पूल, उद्यान कक्ष अशा मध्यवर्ती यंत्रणा स्तरावर ७९० कोटींचा खर्च देणार आहेत. या सर्व कामांपैकी ५० टक्के कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. सर्व कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ ची मुदत देण्यात आली आहे. उड्डाणपूल, आकाशमार्गिकांवरचा अंधार दूर करणारे विशेष दिवे लावले जाणार आहेत. तसेच वाहतूक बेटे, रस्ते, पदपथांवरही रात्रीच्यावेळीही चांगला उजेड असेल याची खबरदारी घेतली जाणार आहे.

हेही वाचा >>>जॉन्सन अँड जॉन्सनची उच्च न्यायालयात धाव; बालप्रसाधन उत्पादन परवाना रद्द करण्याच्या एफडीएच्या निर्णयाला आव्हान

कोणत्या कामासाठी किती खर्च

पदपथांची सुधारण…….६० कोटी

आकाशमार्गिकांवरील दिवे लावण्यासाठी ….४० कोटी

समुद्र किनाऱ्यांवर रोषणाईसाठी ….२५ कोटी

उद्यानांचे सुशोभिकरण व दिवे लावणे …..१५ कोटी

जाहिरातीसाठी डिजीटल फलक ….१० कोटी

किल्ल्यांची रोषणाई …२५ कोटी

गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभिकरण ….२० कोटी

मियावाकी वृक्षलागवड ….२ कोटी

स्वच्छतेसाठी यांत्रिक उपकरणे …..१५ कोटी

सुविधा शौचालयांची निर्मिती ……….७८ कोटी

एकूण २९० कोटी