कल्याण-डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात केसपेपरच्या माध्यमातून जमा झालेली ३३४० रुपयांची रक्कम रमेश कांबळे या व्यक्तीने चोरली. रमेश शनिवारी रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी आला होता. या वेळी कर्मचारी चंदा मेवाडे या कामात असल्याचे पाहून रमेशने ड्रावरमध्ये ठेवलेली रक्कम हातोहात लांबवली.