राज्यातील रस्ते अपघातांस कारणीभूत ठरणाऱ्या अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये लुकलुकणारे दिवे, तसेच वाहनांचा वेग दर्शविणारे इंडिकेटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा- अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यासह शिपाई बडतर्फ

Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

मद्य पिऊन किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे, भरधाव वेगात पुढील गाडी ओलांडून जाणे ही प्रमुख कारणे अपघातांमागे असली तरी रस्त्यांची दुरवस्था, धोकादायक वळण, संरक्षक भिंत किंवा कठडे, गतिरोधक नसणे आदी बाबीही त्यास कारणीभूत ठरत आहेत. सलग तीन वर्षांमध्ये ५०० मीटर क्षेत्रामध्ये एकूण पाच प्राणांतिक, गंभीर, एक किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झालेल्या स्थळांची माहिती गोळा करण्यात येते आणि ते ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित अपघात क्षेत्र येतात. राज्यात एकूण एक हजार चार अपघातप्रवण क्षेत्र असून यापैकी सर्वाधिक ६१० अपघातप्रवण क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर आहेत.

हेही वाचा- Video: “हा व्हिडीओ पाहा, उद्धव ठाकरेंच्याही पायात बूट…”, भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर!

संबधित विभागाने तातडीने अपघातप्रवण क्षेत्र दूर करण्याचे किंवा त्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी परिवहन आयुक्त कार्यालयातील अधिकारी, रस्ते अखत्यारित असलेले विभाग आदी यंत्रणांतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी काही सूचना केल्या होत्या.
अतिवेगात वाहने चालविण्यात येणारे राज्यातील विभाग, घोषित प्रवणक्षेत्र आदी ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारे कॅमेरे (व्हेईकल स्पीड सेन्सर-व्हीएसएस) बसवण्यात येणार आहेत. ‘सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चार ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ वर्षभरात या मार्गावर वाहनांचा वेग मोजणारे आणखी काही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यात अतिवेगाने वाहन चालविण्यात येणारी ठिकाणे आणि घोषित अपघातप्रवण क्षेत्रातही ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू असून रस्ते अखत्यारित असलेल्या यंत्रणांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे’, असे राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले.

हेही वाचा- 26/11 Mumbai Terror Attack: आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग, इराण ते मुंबई व्हाया…!

अपघातप्रवण क्षेत्रात दिवे

महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये मोठे फलक लावण्यात येणार असून अपघातप्रवण क्षेत्र समजावेत यासाठी तेथे लुकलुकणारे दिवेही बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालक सावध होतील आणि भागातून जाताना वाहनाच्या वेगावर मर्यादा ठेऊन योग्य ती खबरदारी घेतील, असे भीमनवार म्हणाले.