आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत आता वादात सापडलाय. राकेशला काल रात्री मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, काही वेळातच त्याची जामीनावर सुटकाही करण्यात आली.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ऋतू खन्नासोबत आक्षेपार्ह वर्तन आणि धमकी दिल्याच्या आरोपावरुन राकेश सावंतला अटक करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच जामीनावर सुटका झाल्यानंतर राकेशने प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपण निर्दोष असल्याचा दावा करत पुढील चौकशीत ते स्पष्ट होईल असे सांगितले.
काल रात्री ओशिवरा येथील लोखंडवाला परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये अभिनेत्री ऋतू तिचा प्रियकर रोहित कपूरसोबत गेली होती. त्याचवेळी शेजारच्या टेबलवर बसलेल्या राकेशने आणि त्याच्या काही मित्रांनी माझ्यावर अश्लील टिप्पणी मारणं सुरु केलं. मोबाइलमधून फोटो देखील काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर रोहितने तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनास्थळी बोलावले, असे अभिनेत्री ऋतूने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असून कॉफी शॉपमधील सीसीटीव्ही फूटेज तपासणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2016 रोजी प्रकाशित
राखी सावंतच्या भावाने काढली अभिनेत्रीची छेड
अभिनेत्री ऋतू खन्नासोबत आक्षेपार्ह वर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
First published on: 09-01-2016 at 13:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress files molestation charges against rakhi sawants brother