मुंबई: शस्त्रास्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द परिसरात अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ८ बंदुका आणि १५ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. चेतन माळी (२६) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो कल्याण परिसरात वास्तव्यास होता.

हेही वाचा >>> एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या गळ्यावर ब्लेडने वार, तरूणी गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतन अनेकांना शस्त्रास्रांचा पुरवत करीत असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपीला मानखुर्द परिसरात बोलावले. त्यानुसार आरोपी काही शस्त्रे घेऊन येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याजवळची बॅग तपासली असता, त्यामध्ये चार बंदुका मिळाल्या. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता त्याच्या घरी तीन बंदुका असल्याची माहिती त्याने दिली. तसेच बोरिवली येथे राहणाऱ्या सिनू पडगिला (४८) याला एक बंदूक दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या सर्व बंदुका पोलिसांनी जप्त केल्या. तो हा शस्त्रसाठा कुठून आणत होता याबाबत पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करीत आहेत.