दरवर्षीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहरातील नालेसफाईची गुरुवारी पाहणी करणार आहेत. महापालिकेचे आयुक्त अजोय मेहताही यावेळी पालिकेच्या कामाचा आढावा घेतील. शहरात सुमारे ३ लाख २८ हजार मीटर लांबीचे नाले असून त्यातून ३ लाख ६० हजार क्युबिक मीटर गाळ काढावा लागणार आहे. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करायचे असून आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. याचप्रमाणे २३ हजार मीटर लांबीच्या मिठी नदीतील एक लाख ७८ हजार क्युबिक मीटर गाळ हटवावा लागणार असून या नदीतील गाळ काढण्याचे कामही ४० टक्के पूर्ण झाल्याचे घनकचरा व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.

“उपोषण करणं हे आपलं काम नाही, मी उद्या…”; ठाण्यातील उपोषणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ॲड. के.एच.देशपांडे यांचे व्यक्तीमत्व तरुणांसाठी आदर्श,” सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वक्तव्य

“घानाच्या शिष्टमंडळात राहुल नार्वेकरांचं नाव नव्हतं, मात्र…”; आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

हिंगणघाट जळीतकांडातील मृत अंकिताच्या कुटुंबास ५ लाखाची मदत; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित