महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून युतीबाबत कुठलाही प्रस्ताव अजून तरी मिळाला नाही असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली नाही त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती. युतीचा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीवर देखील जाऊन आले अशी चर्चा होती. दोन्ही पक्षांकडून याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि मनसे बाबत चर्चांना रंग आला होता. आतापर्यंत आपल्याला युतीचा प्रस्ताव आला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर इतिहास घडेल असे मनोहर जोशींनी देखील म्हटले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन लढतात की काय? याची उत्सुकता सर्वांना वाटू लागली होती. जर शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढले तर मराठी माणसाच्या मनात संभ्रम देखील राहणार नाही असाही एक विचार होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्षाशी पूर्ण शक्तिनिशी लढणार

भारतीय जनता पक्षाविरोधात आपण पूर्ण शक्तिनिशी लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये युती तुटल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कडकडून टीका करत आहेत. शिवसेनेसोबत आपण पारदर्शकतेच्या मुद्दावरुन युती मोडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले तर आज तुमचा घसा बसला उद्या तुम्हाला घरी बसावे लागेल अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे. भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा बसला होता. त्या संदर्भात ते बोलत होते.

बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले परंतु उद्धव यांच्याशी भेट नाही

उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून फारकत घेत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय चित्र बदलले. या बदललेल्या परिस्थितीत मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. उद्धव हे बाळा नांदगावकर यांना भेटले नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांनी नांदगावकर यांचे म्हणणे ऐकून घेतले व ‘याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील’,असे त्यांना सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udhav thackrey raj thackery maharashtra navnirman sena shivsena bjp
First published on: 30-01-2017 at 17:03 IST