मुंबई/ठाणे/कल्याण : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, तर शहापूर तालुक्यातील काही भागांत गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पहाटे आणि संध्याकाळी गडगडाटासह पाऊस कोसळला. रविवार सुट्टी असल्याने साखर झोपेत असलेल्या मुंबईकरांना ढगांच्या गडगडाटाने जागे केले. त्यानंतर दुपारभर मुंबईचे आकाश पावसाळलेले होते. मात्र संध्याकाळी ते पूर्णपणे काळवंडले आणि पाऊस सुरू झाला. परिणामी, बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. ठाण्यात पावसामुळे काही भागांत विद्युत पुरवठा खंडीतझाला, तर रात्री वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली. भिवंडीतील काल्हेर भागात रविवारी सकाळी ७च्या सुमारास काशीनाथ पार्क या इमारतीवर वीज कोसळून आग लागली. यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

ठाणे जिल्ह्यात रविवारी पहाटे आणि सायंकाळी पाऊस कोसळला. ठाणे शहरात सायंकाळी आकाश काळवंडले आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. रविवार असल्याने शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. तरीही पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.

हेही वाचा >>>मराठय़ांना नव्हे, तर झुंडशाहीला विरोध,मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन; गावबंदी फलक लावल्यास कायद्यानुसार गुन्हा

कल्याण, डोंबिवली भागातही अवचित कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांचा तारांबळ उडाली. काही बाजारपेठा ओस पडल्या. शहापूर, मुरबाड आणि भिवंडीच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची भात मळणीची कामे सुरू आहेत. पावसाने मळणी केलेल्या भाताचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांवरील पत्राची छप्परेही उडाली. टेंभुर्णी गावात एका शेतकऱ्याचे घर कोसळले. शहापूरच्या समर्थ नगर भागात एका रहिवाशाच्या घरावर झाड कोसळले. आदिवली भागात गारपीटीसह पाऊस कोसळला, असे ग्रामस्थ वसंतकुमार पानसरे यांनी सांगितले.©

अंदाज काय?

ठाणे, पालघर, रायगडसह मुंबईत आज सोमवारीही मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन आठवड्यांनी कमाल तापमानात घट अपेक्षित आहे. ८ डिसेंबरनंतर किमान तापमानात घसरण होऊन थंडी अवतरण्याचा अंदाज आहे.

गारपिटीचा मारा

शहापूर, मुरबाड आणि भिवंडीच्या ग्रामीण भागात भात मळणीची कामे सुरू असताना अवचित कोसळलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपिटीने पिकांची नासधूस केली आहे.