जगातल्या प्रमुख चार फॅशन वीकमध्ये नावाजला गेलेला एक सोहळा म्हणजे न्यूयॉर्क फॅशन वीक. जगभरातल्या फॅशन प्रेमींचं आणि ब्रॅण्डचं लक्ष लागून राहिलेल्या या सोहळ्यात दरवर्षी सप्टेंबर आणि फेब्रुवारी असे दोन भाग असतात.  सप्टेंबर २०१६च्या मोसमात वैशाली शदांगुळे ही मराठी फॅशन डिझायनर तिचं कलेक्शन सादर करणार आहे. वैशाली एस या ब्रॅण्डअंतर्गत यंदा ‘एसएस १७ – द क्वाएट फ्लोज द थ्रेड’ हे कलेक्शन सादर करणार आहे. या कलेक्शनमधून वैशालीला एका साध्याशा धाग्याचा महावस्त्रापर्यंतचा प्रवास दाखवायचा आहे. त्यासाठी ती खादी, चंदेरी, महेश्वरी या धाग्यांवर काम करणार आहे. वैशालीचा हातखंडा असणारी साडी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये नसेल परंतु त्याऐवजी भारतीय पारंपरिक धागे आणि हातमागावरचे कापड या दोन्हींचा वापर करून डिझाइन केलेले परदेशी धाटणीचे कपडे ती रॅम्पवर दाखवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅशन शो आणि रॅम्पने काहीशा नाकारलेल्याच मराठमोळ्या कपडय़ांना आणि साजशृंगाराला वैशालीने प्रथमच रॅम्पवर ओळख दिली. महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणी साडय़ांवर प्रयोग करून तिने सादर केलेले पैठणी कलेक्शन विशेष गाजले. यानंतर मराठमोळे खण, चंदेरी साडय़ा, ज्यूट अशा प्रकारच्या पारंपरिक वस्त्रांवर आधारित कलेक्शन्स सादर करून वैशालीने रॅम्पला वेगळी ओळख दिली. फक्त हे कपडेच नव्हेत तर गजरा, टिकली, नथ, बांगडय़ा, जोडवे, कुंकू या रॅम्पने कधीही न पाहिलेल्या पण अतीव सुंदर अशा शृंगारसाधनांची ओळखही वैशालीने फॅशनविश्वाला करून दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaishali shadangule in new york fashion week
First published on: 29-08-2016 at 01:43 IST