मुंबई : नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमांतून अभिनेते म्हणून आपली छाप उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसूरकर यांचे मंगळवारी चेंबूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर चेंबूरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अविनाश मसूरकर यांनी ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘हॅण्ड्सअप’, ‘शततारका’ अशा नाटकांमध्ये काम केले होते, तर ‘कलावंतीण’, ‘सुशीला’, ‘सूनबाई ओटी भरून जा’, ‘जन्मकुंडली’, ‘ते आठ दिवस’ अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. त्यांनी केलेली ‘घरकुल’ ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यांनी काही चित्रपटांसाठी पटकथा लेखनही केले होते. १९८१ साली ‘संसार’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता.