scorecardresearch

पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी १ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी

निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरपूर्वी किमान तीन वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.

पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी १ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी १ ऑक्टोबरपासून मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू होत

आहे. त्यासाठी मतदार नोंदणी होणार आहे. त्यासाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी केले.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरपूर्वी किमान तीन वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. १८ भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र  https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या लगतच्या सहा वर्षांतील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र.१९ भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या