लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्यात येणार आहे. सोमवार, २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला आहे.

आणखी वाचा-मुंबई : विहार तलाव भरून वाहू लागला, पाणीसाठ्यात मोठी वाढ; सात धरणांतील जलसाठा ६६ टक्क्यांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र जुलै महिन्यातील पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला असून त्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ लागली होती. गुरुवारी दिवसभरात विहार आणि मोडक सागर हे जलशय काठोकाठ भरले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार धरणे भरल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.