scorecardresearch

Premium

पुलाच्या कामासाठी जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान १४ तासांचा ‘ब्लॉक’; लोकल वेळापत्रकावर परिणाम

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Western Railway
लाच्या कामासाठी जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान १४ तासांचा ‘ब्लॉक’

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच जलद मार्गावरील लोकलला फलाट उपलब्ध नसल्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधी मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट – बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Western railway will maintain a block between jogeshwari goregaon for bridge work mumbai amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×