मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील आकडे चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु झाली असून सर्वसामान्यांच्या मनात या लॉकडाउनने धास्ती निर्माण केली आहे. करोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन करायचा पण त्यामुळे आर्थिक प्रश्न उभे राहणार त्याचं काय ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने आज मुंबईकरांची लॉकडाउनबद्दलची मत जाणून घेतली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What mumbaikars think about lockdown dmp
First published on: 22-02-2021 at 19:13 IST